माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. कार्यकर्त्यांमध्ये 'दादासाहेब' म्हणून लोकप्रिय असलेले माणिकराव नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहिले होते. आणि त्यांच्यामुळेच एकेकाळी नंदुरबार काँग्रेसचा गड मानला जायचा.